नॅनोकोट ∞ ACCT वापरण्याच्या सूचना

नॅनोकोट ∞ ACCT हे रेडी टु यूज “Ready To Use” जल-आधारित कंपाऊंड आहे ज्यात गंज नियंत्रणासाठी तीन महत्त्वपूर्ण गुणधर्म आहेत.

  • ACCT तंत्रज्ञानाचा वापर करून स्टीलच्या पृष्ठभागावर असलेला गंज काढून टाकला जातो.
  • स्टीलच्या पृष्ठभागावर पारदर्शक आवरण तयार करून स्टीलला पुढील गंजण्यापासून संरक्षण केले जाते.
  • नॅनोकोट ∞ स्टीलसह चांगले प्राइमर / पेंट अ‍ॅडेजन करण्यासाठी बॉन्डिंग वाढवते.

वापर: एमएस स्टील (हॉट रोल्ड आणि कोल्ड रोल्ड)आणि कास्टआयरन स्टील उत्पादन करिता.

About
About

पृष्ठभाग पूर्वतयारी:

  • नॅनोकोट लावण्यापूर्वी गंज, घाण, तेल, मिल स्केल, पेंट आणि इतर दूषित पदार्थ स्टीलच्या पृष्ठभागावरून पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत. नॅनोकोट चा कोट करण्यापूर्वी स्टीलच्या पृष्ठभाग स्वच्छ कापडाने पुसून घ्या, हे सुनिश्चित करा की ते पूर्णपणे कोरडे आणि ओलाव्यापासून मुक्त आहे.
  • टूल: वायर ब्रशिंग, चिपिंग, स्क्रॅपिंग, एमरी-पेपर नंबर 80 < - > आणि 120 ^ द्वारे क्रॉस-मेथड ने मॅन्युअल सॅंडिंग करा.
  • पॉवर टूल: अँगल ग्राइंडर सह वायर कप-ब्रश, स्यांडब्लास्टिंग, ग्रिटब्लास्टिंग, वॉटरजेट इत्यादी.
About

नॅनोकोट ∞ ACCT चा वापर:

  • वापरण्यापूर्वी व्यवस्थीत हल‌उन घ्या.
  • टूल: ब्रश,कॉटनरोलर किंवा कॉटनकापड फक्त, वापर आणि साठवणुकीसाठी प्लास्टिक चा डब्बा वापरा.
    पत्र्याच्या डब्बा कधीही वापरू नका, ब्रश कॉटनरोलर किंवा कापड नवीन वापरा.
  • स्टीलच्या पृष्ठभागावर नॅनोकोट चे 1 ते 2 कोट समानपणे लावा, प्रत्येक कोटदरम्यान जास्तीत जास्त 15-20 मिनिट वाळवण्यास वेळ द्या. अंतिम परिणाम काळा किंवा स्टील फिनिश असावा, नॅनोकोट∞डीएफटी 10-15 मायक्रॉन.
  • टचड्राय: वातावरण परिस्थितीनुसार वाळवण्याची वेळ 30* मिनीट ते 1* तास असते.
  • हार्डड्राय: नॅनोकोट केल्याला स्टील 5 ते 6 तास वाळु दया. या दरम्यान नॅनोकोट केल्याला स्टीलशी पाण्याचा संपर्क टाळा.
  • ब्रश, कॉटन रोलर आणि इतर अवजारे पाणी आणि साबणाचे पाणी वापरुन ताबडतोब स्वच्छ करा.
About
About
About

प्राइमर आणि टॉपकोट चा वापर:

  • कोणतेही प्राइमर वापरु शकता. (#वैकल्पिक)
  • नॅनोकोट ∞ ACCT केल्याला प्राथमिक पृष्ठभागावर एनेमल, एपॉक्सी, पीयू, ईत्यादी फायनल फिनिशिंग पेंट केला ञाऊ शकतो.
  • ^प्राईमर आणि पेंट चा वापर निर्मात्यांच्या SAP अनुसार करा. (SAP=Standard Application Process)
About

सुरक्षा पूर्व- सावधानी:

  • मुलां पासून लांब ठेवा.
  • हवेशीर भागात वापरा. गिळू आणि पिऊ नका. त्वचा आणि डोळ्यांशी थेट संपर्क टाळा.
  • पीपीई: रबर किंवा नाइट्रियल ग्लोव्हज आणि सेफ्टी चष्मा वापर करा.
  • अधिक माहितीसाठी, आमच्या तांत्रिक माहितीदाराशी संपर्क साधा.
  • वापरण्यापूर्वी सुरक्षा डेटा शीट वाचा.
About
About
About

स्टोरेज:

  • नॅनोकोट ∞ ACCT वापरात नसताना प्लास्टिक चा डब्बा घट्ट बंद ठेवा. थंड कोरड्या भागात थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.